मराठी उखाणॆ Marathi Ukhane | नवरदेव-नवरीसाठी 🎉💑

मराठी उखाणॆ Marathi Ukhane | नवरदेव-नवरीसाठी 🎉💑 

नवरी साठी उखाणे :  

अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
(पतीचे नाव)….. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले.. हे सांगतात सनईचे सूर..

नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी..
 नदीच्या काठी कृष्ण वाजवितो बासरी,
 (पतीचे नाव)…... पाटलांचे नाव घेते मी आले सासरी..

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी... 
लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी
पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी
(पतीचे नाव)…... रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून.... 
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून.... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून.

दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी... 
दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी.. 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी.

सासरची छाया, माहेरची माया... 
सासरची छायामाहेरची माया... 
(पतीचे नाव)…... राव आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया.

पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता... 
पुरूष म्हणजे सागरस्त्री म्हणजे सरिता... 
(पतीचे नाव)…... रावांचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता

आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा... 
आग्रहाखातर नाव घेतेआशीर्वाद द्यावा... 
(पतीचे नाव)…... रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट... 
रुपेरी सागरावर चंदेरी लाट... 
(पतीचे नाव)…... रावांच नाव घेते सोडा आता माझी वाट.

सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात...
सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात...
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते पण आता सोडा माझी वाट... 

उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली.. 
 उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली.. 
(पतीचे नाव)…...रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली, धन्य ती माऊली... 

या झाडावरूनत्या झाडावर उडत होते पक्षी.... 
या झाडावरूनत्या झाडावर उडत होते पक्षी.... 
(पतीचे नाव)…...रावांचे नाव घेते ,चंद्र सूर्य आहेत साक्षी .

गोर्‍या गोर्‍या हातावर रेखाटली मेहंदी ..... 
गोर्‍या गोर्‍या हातावर रेखाटली मेहंदी... 
(पतीचे नाव)…...रावांचे नाव घेण्याची यावी वारंवार संधि

जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस... 
जुलै महिन्यात कधीही पडतो पाऊस...  
(पतीचे नाव)…... राव माझे कम्प्युटर आणि मी त्यांची माऊस. 

आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे....  
आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावे ... 
(पतीचे नाव)…... रावांसारखे पति जन्मोजन्मी मिळावे.

आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम... 
आई ने केले संस्कारबाबांनी केले सक्षम... 
(पतीचे नाव)…... रावांसोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते.. 
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते.. 
(पतीचे नाव)…... रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते

अवघे जीवन आनंदाने कसे भरभरून आले.. 
अवघे जीवन आनंदाने कसे भरभरून आले.. 
(पतीचे नाव)…... रावांमुळे मी सौभाग्यवती झाले.

जिजाऊच्या पोटी जन्मले शिवाजी सारखे सुपुत्र... 
जिजाऊच्या पोटी जन्मले शिवाजी सारखे सुपुत्र... 
(पतीचे नाव)…...रावांच्या नावाने गळ्यात घातले मंगळसूत्र.

सर्वांना करते नमस्कार, आशीर्वादाचा द्या आहेर... 
सर्वांना करते नमस्कारआशीर्वादाचा द्या आहेर
(पतीचे नाव)…... रावांच्या च्या साथीसाठी सोडून आले माहेर.

राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला

संसाराच्या सागरात प्रेमाची होडी... 
संसाराच्या सागरात प्रेमाची होडी...  
(पतीचे नाव)…... रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी.

..आई वडील, भाऊ बहीण, माझे जणू आहे गोकुळ सारखे घर..
..आई वडीलभाऊ बहीण, माझे जणू आहे गोकुळ सारखे घर..
(पतीचे नाव)….. रावांच्या आगमनाने पडली त्यात सुखाची भर...

मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर... 
मंगलसुत्रातील दोन वाट्या सासर आणी माहेर...
(पतीचे नाव)…... रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर

शुंक्राची चांदणी ,ढगाला देते शोभा... 
शुंक्राची चांदणी ,ढगाला देते शोभा... 
(पतीचे नाव)…... रावांच्या पाठीमागे ,परमेश्वर उभा

अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य... 
अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य... 
(पतीचे नाव)…... रावांचा आनंद हेच माझे सौख्य.

जाई जुईच्या वेलीखाली ,हरीण घेते विसावा... 
जाई जुईच्या वेलीखाली ,हरीण घेते विसावा... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते ,तुमचा आशीर्वाद असावा

कुळदेवताला स्मरून ,वंदन करते देवाला... 
कुळदेवताला स्मरून ,वंदन करते देवाला... 
(पतीचे नाव)…... रावांचे सौभाग्य,अखंड दे मला

कपाळाला कुंकू ,गळ्यात मोत्याचा हार... 
कपाळाला कुंकू ,गळ्यात मोत्याचा हार... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेताना  ,आनंद होतो फार

संसाराला स्त्रीने नेहमी राहावे दक्ष... 
संसाराला स्त्रीने नेहमी राहावे दक्ष... 
(पतीचे नाव)…... रावांचे  नाव घेते इकडे द्या लक्ष.

माहेरचे निरांजन ,सासरची वात... 
माहेरचे निरांजन ,सासरची वात... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेऊन ,करते संसार सुखात.

सुवर्णाच्या कोंदणात ,हिरा शोभतो छान... 
सुवर्णाच्या कोंदणात ,हिरा शोभतो छान... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेऊन ,राखते सर्वाचा मान .  

पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता... 
पुरुष म्हणजे सागरस्त्री म्हणजे सरिता... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां कारिता

मंदिरात वाहाते, फुल आणि पान... 
मंदिरात वाहातेफुल आणि पान... 
(पतीचे नाव)…... रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.

राजा राणी चा संसाराचा प्रवास आहे नवा... 
राजा राणी चा संसाराचा प्रवास आहे नवा...
अन(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेयला उखाणा कशाला हवा.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे... 
गुलाबाचे फुल दिसायला ताजे... 
(पतीचे नाव)…... रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

हाता वरच्या मेहंदी ला रंग चढला छान.... 
हाता वरच्या मेहंदी ला रंग चढला छान... 
(पतीचे नाव)…... रावांचे नाव घेते राखून तुमचा मान.

नवरदेव साठी :

भाजीत भाजी मेथीची... 
भाजीत भाजी मेथीची... 
(पत्नीचे  नाव)….माझ्या प्रीतीची.

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ.... 
चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ.... 
(पत्नीचे  नाव)… चं नाव घेतो पुढचं काहीच नाही पाठ.

नावामध्ये आहे काय... ? नका हट्ट धरू.... 
नावामध्ये आहे काय.... नका हट्ट धरू....
माझा उखाणा जुळत नाही😁 (पत्नीचे  नाव)… काय ग मी करू.

खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम... 
खेळायला आवडतोमला क्रिकेट गेम... 
(पत्नीचे  नाव)… वर आहे माझे खूप प्रेम.

 फुलात फूल मदनबाण... 

 फुलात फूल मदनबाण... 

(पत्नीचे  नाव)…माझी जीव की प्राण


विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात... 

विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात... 

(पत्नीचे  नाव)… अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.

एका वर्षात, महिने असतात बारा... 
एका वर्षातमहिने असतात बारा... 
(पत्नीचे  नाव)… मुळे वाढलाय, आनंद सारा

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास.... 
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास... 
(पत्नीचे  नाव)… ला देतो मी लाडवाचा घास

एक दोन तीन चार... 
एक दोन तीन चार... 
(पत्नीचे  नाव)… वर आहे, माझे प्रेम फार

 दूधापासून बनते दही, चक्का, तूप... 

 दूधापासून बनते दहीचक्कातूप... 

(पत्नीचे  नाव)…आवडते मला खूप खूप.

(पत्नीचे  नाव)… माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,
(पत्नीचे  नाव)… माझी आहेसर्व कलांमध्ये कुशल,
तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल. 

 इंद्राची इंद्रयणी दुष्यतांची शकुंतला... 

इंद्राची इंद्रयणी दुष्यतांची शकुंतला... 

(पत्नीचे  नाव)… नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.

सितेने केला पण रामालाच वरीन... 
सितेने केला पण रामालाच वरीन... 
(पत्नीचे  नाव)… च्या साथीने आदर्श संसार करीन

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल. 
तिची नि माझी केमिस्ट्रीआहे एकदम वंडरफुल. 
(पत्नीचे  नाव)…माझी आहे, खरच किती ब्युटीफुल

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी... 
भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी... 
(पत्नीचे  नाव)… ची आणि माझी आहे लाखात एक जोडी.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल... 
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल... 
(पत्नीचे  नाव)…चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे... 
आकाशाच्या पोटातचंद्रसूर्यतारांगणे... 
(पत्नीचे  नाव)… च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे

टिप्पण्या