Career After 10th, / दहावीनंतर काय? दहावी पास झालात.

Career After 10th, / दहावीनंतर काय? दहावी पास झालात.

after 10,दहावीनंतर काय, Career After 10th, dahavi, ssc gd, दहावी, दहावी पास झालात, sscgd, 10th after course in Marathi, dahavi nantar Kay marathi,

विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दहावीचे वर्ष खूप महत्वाचे असते.  दहावीनंतर विद्यार्थ्यांकडे अनेक पर्याय उपलब्ध असतात. केवळ पैसा या बाबत करिअरचा विचार हा मर्यादीत नसावा. तर तुमच्याकडे असलेल्या क्षमता, मेहनत, मिळणारं ज्ञान, या क्षेत्रातील आव्हानं, तसेच तुमच्या अभ्यासाचा उपयोग हे पाहून करिअर निवडावं.दहावी पास झालेनंतर विद्यार्थ्यांकडे करिअर करण्यासाठी भरपूर पर्याय असतात. 

जसे परीक्षा झाल्यानंतर दहावीत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या पुढे नेमक्या कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा, काय करायचे, शिक्षणा बाबतची दिशा कशी ठरवायची असे अनेक प्रश्न पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात घोळत असतात.

 दहावीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करू शकतात. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहेत. आयटीआय या क्षेत्रामध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यामधून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडून यशस्वी होऊ शकतात. 

विद्यार्थी नेहमी लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. मग त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. त्यातली अनेक बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजीज, मेटलर्जी यांसारख्या विषयातून अनेक राज्यातून बरेच तर राज्यातून अवघी १२० मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यातील काहींना लगेच नोकरी मिळते. काही वेळा या कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या ४० % मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळत असतो  आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. परंतु दहावी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांची माहिती घेऊ या.

विज्ञान शाखा -

PCMB ग्रुप -  बारावीतील सायन्स मधील PCMB ग्रुप मध्ये  फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स(गणित) आणि बायोलॉजी या चार विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी अशा विषयांमधून करिअर निवडता येते.

PCM ग्रुप -  बारावीतील सायन्स मधील पीसीएम  ग्रुप मध्ये आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.

PCB GRUP - बारावीतील सायन्स मधील PCB ग्रुप मध्ये मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अँड ऍनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस या विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी आहे.

सायन्स शाखेतूनच एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात करिअर करता येतं.

वाणिज्य शाखा :-

दहावी झाल्यानंतर तुम्ही अकरावीला प्रवेश घेण्यासाठी कला या शाखेची निवड करू शकता. बारावीनंतर विद्यार्थी बी कॉम, फायनान्स, अकाऊंटिंग, टॅक्सेशन, एमबीए, ऑडिटींग, गुंतवणूक क्षेत्र, विमा क्षेत्र, बँक असं मोठं क्षेत्र तसेच अन्य बरेच वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हो क्षेत्र खुलं आहे.

बी. कॉम, बिबिए, सीए, इत्यादी. वाणिज्य पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराचं विस्तीर्ण क्षेत्र खुलं होतं. अकाऊंटंट, फायनान्शिअल अनालिस्ट, अकाऊंट एक्झ्युकेटिव्ह, कनिष्ठ अकाऊंटंट, वरिष्ठ अकाउंटंट, बिझनेस एक्झ्युकेटिव्ह, व्यावसायिक म्हणून विद्यार्थी काम करु शकतात. विमा सल्लागार म्हणून देखील विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध असून अनेक विद्यार्थी त्याकडे वळत आहेत . तर आयबीपीएस तर्फे घेण्यात येणाऱ्या सरकारी बँकांच्या परीक्षा, स्टेट बँक, आरबीआयमधील नोकऱ्यांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थी संधी प्राप्त करु शकतात. 

कला शाखा :

दहावी झाल्यानंतर तुम्ही अकरावीला प्रवेश घेण्यासाठी कला शाखेची निवड करू शकता. बारावी नंतर तुम्ही शिक्षक, वकील, हॉटेल व्यवस्थापन, पत्रकारिता, सरकारी नोकरीची तयारी (UPSC, MPSC) तसेच अन्य व्यवसाय करू शकता. दहावी पूर्ण झाल्यानंतर,  तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता.  त्यापैकी काही येथे आहेत:

मानविकी (Humanities): बॅचलर ऑफ आर्ट्स (BA), बॅचलर ऑफ सोशल वर्क (BSW), बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन (BJMC), बॅचलर ऑफ लायब्ररी सायन्स (BLib), बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA), बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स (BPA). 

फाइन आर्ट्स बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स (BFA), मास्टर ऑफ फाइन आर्ट्स (MFA), कला शिक्षक, कला दिग्दर्शक, फ्रीलान्स आर्टिस्ट.

परफॉर्मिंग आर्ट्स अभिनेता(Actor), नृत्यांगना(Dancer), गायक(Singer) नृत्यदिग्दर्शक(Choreographer), संगीत संयोजक(Music Composer), थिएटर डायरेक्टर(Theatre Director)

पत्रकारिता आणि जनसंवाद (Journalism and Mass Communication):  पत्रकार(Journalist), जनसंपर्क विशेषज्ञ(Public Relations Specialist), कॉपीरायटर(Copywriter),सामग्री लेखक(Content Writer), रेडिओ जॉकी (RJ)Radio Jockey (RJ), टेलिव्हिजन अँकर(Television Anchor)

फॅशन डिझायनिंग : 

फॅशन डिझायनर, फॅशन मर्चेंडायझर, फॅशन इलस्ट्रेटर, टेक्सटाईल डिझायनरफॅशन फोटोग्राफर

आय.टी.आय. –  आयटीआय या क्षेत्रामध्ये बरेच कोर्स/ट्रेड आहेत, त्यामुळे विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार निवडू शकतात.

इयत्ता दहावी झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना लागेचच नोकरीची आवश्यकता आहे, असे विद्यार्थी आयटीआय या  कोर्स ची निवड करू शकतात. हा कोर्स फक्त  एक ते तीन वर्षं कालावधीचाच असतो. यात तीन वर्षांचा एकच कोर्स असतो. अन्य कोर्स हे एक किंवा दोन वर्षांमध्ये पूर्ण होतात. त्यातील काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे -

- आयटीआय टर्नर-

- आयटीआय मेकॅनिक

- आयटीआय वेल्डर

- आयटीआय प्लंबर

- आयटीआय इलेक्ट्रीशियन

डिप्लोमा

  • दहावीनंतर वेगवेगळ्या विषयांचे शॉर्टटर्म कोर्स करू शकता. यामध्ये सर्टिफिकेट आणि डिप्लोमा असे दोन कोर्स आहेत.  यानंतर तुम्ही एखादा छोटा जॉब करू शकता. दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करता येते, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असून त्याचा अभ्यास असावा. हे डिप्लोमा कोर्स ३ वर्षांचे असतात. दहावीनंतर विद्यार्थी सिविल इंजिनीअरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, टेक्सटाइल इंजीनियरिंग, आयसी इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग,   ईसी इंजिनीअरिंग व मायनिंग इंजिनीअरिंग आदि डिप्लोमा अभ्यासक्रमा चे नंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळतो. 
काही कोर्स पुढीलप्रमाणे, 
1 डिप्लोमा इन फाइन आर्ट्स
  • ग्राफिक्स, anomation, डिझायनिंग, प्रोग्रामिंग,  व्हिज्युअलायझेशन अशा अनेक क्षेत्रात तुम्हाला तुमचे करिअर करायचे झाले तर 10 वी नंतर विद्यार्थी फाईन आर्ट मध्ये डिप्लोमा करू शकतात. हा पाच वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे.
2 इंजिनीअरिंगचा डिप्लोमा
  • करण्याचे स्वप्न असेल तर दहावी उत्तीर्ण झाल्यावर ते स्वप्न साकार होऊ शकते. दहावी झाल्यानंतर अभियांत्रिकी डिप्लोमा देणार्‍या भरपूर संस्था आणि कॉलेज आहेत. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित मध्यम स्तरावरील नोकऱ्या सहज मिळतील.

3 डिप्लोमा इन स्टेनोग्राफी -

  • देशात अनेक संस्था आहेत ज्या स्टेनोग्राफीमध्ये डिप्लोमा देतात. हा कोर्स केल्यावर सरकारी वा निम सरकारी बँका, शिक्षणसंस्था, न्यायालये तसेच इतर अनेक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.प्रत्येक सरकारी खात्यात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये अशा नोकऱ्या येत असतात ज्यासाठी स्टेनोग्राफरची भरती करावी लागते. 

4 डिप्लोमा इन आर्किटेक्चर- 

  • हे कलात्मक क्षेत्र आहे. यामध्ये इमारतीचे बांधकाम, रचना, रस्ते यावर काम केले जाते. अतिशय सर्जनशील आणि भौतिकशास्त्र आणि गणिताचे ज्ञान असलेला कोणताही विद्यार्थी तसेच ते  करू इच्छिणारा विद्यार्थी हा पदविका अभ्यासक्रम केल्यानंतर करिअरची निवड करू शकतो.

5 डिप्लोमा इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन-

  • कॉमर्स विषयात अभ्यासू वा अभ्यास असेल आणि व्यवसायाच्या क्षेत्रात जायचे असेल तर 10वी नंतर बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन डिप्लोमा करता येतो. यामध्ये व्यवसाय चालवण्याबाबत शिक्षण दिले जाते. हा डिप्लोमा कोर्स केल्यानंतर एखाद्या कंपनीत नौकरी मिळू शकते किंवा स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करता येतो.
6. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा (Diploma in Hotel Management)

  • हॉटले मॅनेजमेंटचा हा तीन वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे. हॉटले मॅनेजमेंट हा कोर्स करून स्वतःचाच हॉटेल अथवा अन्य प्रशस्थ हॉटेल मध्ये नोकरी मिळू शकते.

 तसेच तुम्ही : डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,  डिप्लोमा इन एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा सिव्हिल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीअरिंग,  डिप्लोमा सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा बायोमेडिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा पेट्रोलियम इंजिनिअरिंग डिप्लोमा, डिप्लोमा इन मायनिंग इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन गारमेंट टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन लेदर टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मरीन इंजिनीअरिंग, डिप्लोमा इन प्रोडक्शन, डिप्लोमा डिप्लोमा प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा बायोटेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन ब्युटी कल्चर,  डिप्लोमा इन आर्किटेक्चर, डिप्लोमा इन ऍग्रीकल्चरल, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग,  डिप्लोमा इन फॅशन डिझाईन,  डिप्लोमा इन अपेरल डिझाईन, डिप्लोमा सायबर सिक्युरिटी, डिप्लोमा मेडिकल लॅब,  डिप्लोमा लायब्ररी आणि माहिती विज्ञान इत्यादी असे कॉर्स करू शकता

सरकारी नोकरी ( Government Jobs)

  • भारतामध्ये अनेक सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला पगार मिळत असतो आणि त्यांना त्यांच्या नोकरीची हमी सुरक्षितता देखील मिळत असते, त्यामुळे याकडे १०वी झाल्यानंतर करिअरचा अत्यंत योग्य पर्याय म्हणून निवड केली जाते. यासाठी तुम्हाला स्पर्धा परिक्षेची मोठ्या प्रमाणावर तयारी करावी लागेल.

उद्योजक 

  • जर तुम्हाला करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध असतील तरी दोखील तुम्ही जर मनाची तयारी केलीत, मनात कायम जिज्ञासा ठेवली, झोकून काम केलं, चिकाटी, मेहनत, प्रामाणिकता, गणिती वृत्ती ठेवली तर व्यवसायातही तुम्हाला यश मिळू शकतं. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि व्यवहारी वृत्ती तसेच मेहनत ठेवली पाहिजे. आपण तरुणांना स्वतः स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने सरकारने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले आहेत. तसेच त्यासाठी  अनुदान देखील सुरु केलेले आहे, मात्र शासकीय तसंच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करत असतात, स्वतःचा उद्योग सुरू करून भरपूर प्रमाणात कमाई करता येते तेही आपल्या वेळेनुसार.

टिप्पण्या