मराठी कोडे व उत्तर / Marathi riddles with answers / Marathi Puzzles with Answers

 मराठीमध्ये कोडे व त्यांचे उत्तर / Marathi riddles and answers / Marathi Puzzles and Answers

नरेश च्या वडिलांना ३ मुले आहेत. गणेश, आणि महेश तर तिसऱ्या मुलाचे नाव काय आहे सांगा?

नरेश 

ऊन बघताच मी येतो, सावली पाहताच मी लाजतो, 💫वाऱ्याचे स्पर्श होताच मी नाहीसा हि होतो. सांगा मी कोण?
घाम

छोटेसे कार्टे संपूर्ण घर राखते.
: कुलूप

अशी कोणती जागा 👭आहे, जिकडे रस्ता आहे; पण🚌 गाडी नाही, आणि जंगल आहे; पण 🌳झाड नाही, आणि शहर आहे; पण पाणी नाही?
नकाशा

जर तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरामध्ये गेलात, आणि तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता, तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण??
तुम्ही

अशी कोणती गोष्ट आहे 🤶जी तुम्हाला देण्याअगोदर तुमच्याकडून घेतली जाते?
तुमचा फोटो

तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,💕 तेवढा तो मोठा होत राहील.💫💫 सांगा पाहू मी कोण?
डोंगर

अशी कोणती इमारत 🏡आहे, ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही,🏚 तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता…?
– ज्याठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत

ती माय, 💛माउली जग तिच्यावर जगत असते, 💧घामाचा ती वास घेते, 💫💫मोत्याची ती रास देते?
जमीन

गोष्ट आहे मी अशी, मला घेता तुम्ही 👩😋खाण्यासाठी, मात्र मला तुम्ही खात नाही; सांगा पाहू मी कोण?
ताट

हे नेहमी पुढे असते, कधीच मागे नसते…?
– आपले भविष्य

दिसत नाही पण घातलेले आहे हा दागिना. हे स्त्रीचे रत्न आहे.
लज्जा

रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत. पहिल्याचं नाव 25 पैसे. दुसऱ्याचं नाव 50 पैसे. चौथ्याचं नाव 100 पैसे. मग तिसऱ्याचं नाव काय असेल?
: रामा

अशी कोणती गोष्ट आहे;💍 जी चोर चोरी करू शकत नाही?
: ज्ञान

एका संगणकाच्या 💻वर बॉम्ब💣 आहे; संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी🔑, फोन आणि एक चहाचा🥤 कप आहे. जर बॉम्बचा स्फोट झाला तर सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?
– बॉम्बचा

असे फळ कोणते त्याच्या पोटात दात असतात?
डाळिंब

कोकणातून येतो, देश विदेशात हि जातो. मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा आहे  महान. हिरवा, पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण?
: आंबा

अशी कोणती गोष्ट आहे; जी गरीब😓 लोक फेकून देतात आणि श्रीमंत लोक खिशात ठेवतात😖😖😖?
: वाहणारे नाक

अशी गोष्ट कि जी तुम्ही गिळू शकता वा ती तुम्हाला हि गिळू शकते सांगा पाहू ती आहे कोणती?
अहंकार

रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे. एक म्हणजे  मंदिर, 2- शाळा व 3- दवाखाना सांगा सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
अँबुलन्स आग विझवित नाही.

असा कोण आहे; ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग🪑 नाही, राहण्यासाठी महाल नाही🏠 आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया 💸सुद्धा नाही, तरीही तो राजा आहे.
सिंह

चार खंडाचा आहे एक शहर, चार आड विना पाण्याचे 18 चोर आहेत; त्या शहरात एक ♕राणी आणि एक शिपाई💂 मारून सर्वांना त्या आडात टाकी.  ओळख पाहू मी कोण?
: कॅरम

हजार येती हजार जाती हजार बसती पारावर😂😂, अशी नारती जोराची हजार घेती ऊरावर
बस/ट्रेन

दोन पाय मोठे दोन पाय 🦵🦵लहान शेतात राबतो ताकद महान💪💪
ट्रॅक्टर

असे काय आहे जे, तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा झोपते आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?
डोळ्याची पापणी

असे काय आहे जे कोपऱ्यात राहून 🗺जगभर प्रवास करते?
: शिक्का

जर आपल्याला तहान🍹🍹 लागली असेल, तर ते आपण पिऊ शकतो. जर आपल्याला भूक🍎 लागली असेल, तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो. आणि थंडी वाजत असेल, तर आपण त्याला🔥🔥 जाळू सुद्धा शकतो सांगा ते काय आहे?
नारळ

प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट 💫कोणती जी नेहमीच वाढत जाते पण कधीही कमी होत नाही😎😎?
वय

तिघे जण वाढायला बारा जण जेवायला?
घड्याळ

तिखट मीठ मसाला, चार शिंगे कशाला?
🏠
लवंग

वाचण्यात आणि लिहिण्यात 📖दोन्ही ठिकाणी असते माझे काम मी नाही कागद मी नाही✐ पेन सांगा काय आहे माझं नाव?
चष्मा

हिरव्या घरात लपले एक लाल घर लाल घरात आहेत खूप लहान मुले ओळखा पाहू मी कोण😋😋
कलिंगड

हिरव्या पेटीत बंद मी काट्यात मी पडलेली उघडून पहा मला मी आहे 💫💫💫मोत्याने भरलेली
भेंडी

मी चालले राग राग😡😡, तु का ग माझ्या माग माग…
सावली

काळ्या रानात हत्ती🐘🐘 मेला, त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
कापूस

डोळा असून सुद्धा मी पाहू शकत नाही
सुई
असं काय आहे, जिच्या डोळ्यात👁 बोट टाकली तर ती तोंड उघडते…?
कात्री

पुरूष असून पर्स वापरतो,वेडा नसून कागद फाडतो
कंडक्टर

प्रश्न असा की उत्तर काय ?
दिशा

एका इमारतीच्या २३०व्या मजल्यावरील एक माणूस खिडकी स्वच्छ करीत असतो आणि अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो. तरी पण त्याला दुखापत होत नाही. हे कसे शक्य आहे?
कारण कि तो इमारतीच्या आतल्या बाजूने  खिडक्या स्वच्छ करीत आहे

कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात?
फेब्रुवारी

सुपभर लाह्या त्यात एक रुपया
चंद्र आणि चांदण्या

मुकुट♔♔ माझ्या डोक्यावर आहे जांभळा झगा माझ्या अंगावर आहे; आहेत मला काटे जरा😜 सांभाळून; चविष्ट आहे मी खातात 😀😀मला भाजून सांगा पाहू मी आहे तरी कोण ?
वांगे

एक वानर🐒एक खारुताई आणि एक माणूस 🌴नारळाच्या झाडावर जोराने धावत होते तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
: नारळाच्या झाडावर केळी नसतात

तुम्ही दहा रुपयांमध्ये 💰💸अशी कोणती वस्तू खरेदी कराल ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?
दहा रुपयाची अगरबत्तीї घेईन आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल.
दोन गुहेचे आहेत दोन 💂💂रक्षक दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर सांगा पाहू मी कोण?
मिशा

अशी कोणती गोष्ट आहे, जिला वापरण्याआधी तोडावे लागते?
अंड

अशी कोणती वस्तू 😋😋आहे जी सर्व मुले खातात परंतु त्यांना की आवडत नाही?
पालकांचा मार किंवा ओरड

पाणी नाही, पाऊस नाही, तरी रान🌳🌳 कसं हिरवं ,कात नाही,चुना नाही, तरी तोंड कसं रंगल
पोपट

अशा भाजीचे 🥀💮🎕नाव सांगा ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे नाव लपलेले आहे…
शिमला

असे कोणते फळ आहे,🍉 जे बाजारात विकले जात नाही?
मेहनतीचे फळ

एका माणसाचे चार अक्षरी नाव काय? ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे हे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या 👩मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांगा पाहु ते नाव काय💁💁?
सीताराम

मी हिरवा आहे पण मी पान🍂 नाही. मी अनुकरण करणारा आहे 😁परंतु मी वानर नाही. सांगा पाहू मी कोण
पोपट

मी एका टेकडीच्या 👉शिखरावर उभा राहिलो आणि दोन 🏡घरांच्या दरम्यान मोठ्याने 📌घंटा वाजविले. कोणते घर प्रथम घंटा ऐकेल?
दोन्हीही घरे ऐकू शकत नाहीत,कारण घरांना कान नसतात

टिप्पण्या